Chhatrapati Sambhajinagar News : अंतरवाली सराटीत ४ जूनपासून बेमुदत उपोषण : मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

Manoj Jarange Patil

Chhatrapati Sambhajinagar News : येत्या 4 जूनच्या उपोषणाची तारीख तीन महिन्यांपूर्वी ठरली आहे. या तारखेत कुठलाही बदल होणार नाही. अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

छत्रपती संभाजीनगर : येत्या 4 जूनच्या उपोषणाची तारीख तीन महिन्यांपूर्वी ठरली आहे. या तारखेत कुठलाही बदल होणार नाही. अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण केले जाणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सोमवार 20 मे रोजी सकाळी त्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही कितीही एसआयटी लावा, आरोप करा, गुन्हे दाखल करा, मात्र तुम्हाला मराठा समाजाची एकजूट, ताकद चार जूनच्या उपोषणातून दिसून येईल. तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच्या मागणीसाठीच हा लढा सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.
तुमच्यावर जातीयवादाचे आरोप करण्यात येत आहेत. यावर जरांगे म्हणाले की, मी कुठलाही जातिवाद केलेला नाही आणि गाव खेड्यात मराठा- ओबीसी समाजात कुठलेही जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले नाही, करणार नाही. असे असताना ओबीसी नेते मला जातीयवादी म्हणत आहेत. निवडणूक मतदान होईपर्यंत मी जातीयवादी नव्हतो आणि मतदान झाल्यानंतर मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी ओबीसी नेत्यांवर केला.

आता प्रमाणपत्रांना गती मिळेल !

जरांगे पाटील म्हणाले की, प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याबद्दल विचारले असता, काही ठिकाणी अधिकारी मनमानी करत असून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र मी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली. तेव्हा ते बोलले, मनुष्यबळ निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रमाणपत्राला थोडा विलंब होत असून आचारसंहितेनंतर २० तारखेपासून प्रक्रिया गतीने सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »