सिध्दार्थ उद्यान अपघात प्रकरण : ठेकेदार, वास्तु विशारदासह पाच जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर :  शहर परिसरात बुधवारी 11 जून सायंकाळी आलेल्या वादळामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा काही भाग अंगावर कोसळल्याने दोन पर्यटक महिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनपाकडून दिलेल्या तक्रारून क्रांती चौक पोलिस ठाण्यास ठेकेदार, वास्तु विशारदासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती अमोल खैरनार (37, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी), रेखा हरिभाऊ गायकवाड, (65, रा. गजानननगर, हडको) या दोन महिलांचा बुधवारच्या घटनेत मृत्यू झाला होता. 

छत्रपती संभाजीनगर :  शहर परिसरात बुधवारी 11 जून सायंकाळी आलेल्या वादळामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा काही भाग अंगावर कोसळल्याने दोन पर्यटक महिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मनपाकडून दिलेल्या तक्रारून क्रांती चौक पोलिस ठाण्यास ठेकेदार, वास्तु विशारदासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती अमोल खैरनार (37, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी), रेखा हरिभाऊ गायकवाड, (65, रा. गजानननगर, हडको) या दोन महिलांचा बुधवारच्या घटनेत मृत्यू झाला होता. 

या प्रकरणी मनपा बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय लक्षमण चामले यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून प्रकाश सदाशिव पाटील, श्रीकांत गंगाधर गायकवाड, जयश्री किसनराव नाडे, दिपक पाटील, वास्तु विशारद आमरेश जोशी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी हवेचा वेग 4 किमी प्रतितास इतका कमी होता. आर्द्रता 89 टक्क्यापर्यंत होती. सायंकाळी 6 वाजेनंतर मात्र वादळ उठले. 6.45 ते 7.30 वाजेपर्यंत ताशी 30 ते 80 किमी वेगाने वादळी वारे वाहिले. पावसाच्या सरीही कोसळल्या. वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग्ज, पत्रे, दुकाना बाहेरील कपडे, हलक्या वस्तू वादळी वाऱ्याने आकाशात उडल्या. पादचारी, हातगाडीवाले, पाल मांडून व्यवसाय करणारे, वाहन चालकांची प्रचंड त्रेधा उडाली. या वादळामुळे पावणेसात वाजेच्या सुमारास सिद्धार्थ उद्यानाचे सिमेंटचे गेट पर्यटक पथ विक्रेत्यांच्या अंगावर पडले. यावेळी प्रचंड गोंधळ उडून आक्रोश सुरू झाला. पर्यटक स्वाती खैरनार, रेखा गायकवाड यांच्या डोक्यावरच सिमेंट आणि विटा कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेख अकील रहीम हा गंभीर जखमी झाला आहे. इतर 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेनंतर उद्यान रिकामे करण्यात आले. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उद्यान निरीक्षक विजय पाटील, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी भेट देवून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूवच यातील दोन महिला पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. 

दोषींवर कारवाईची मागणी 

मनपाकडून दिलेल्या तक्रारीनंतर ठेकेदार, वास्तुविशारदांकवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी समोर येत आहे. मनपाकडून संबंधीत ठेकेदारांना कामाचे स्टक्चरल ऑडिट करण्याच्ा सूचना देण्यात आल्या होत्या मात्र ते करण्यात आले नाही. याशिवाय काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याच्याही काही तक्रारी त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या मात्र त्याची मनपाकडून दळल घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या अपघाताच मनपा प्रशासही जबाबदार असल्याच्ाा आरोप होत आहे. 

मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत 

घडलेली घटना दुर्देवी आहे. प्रवेशद्वाराच्या मेंटेनन्सची जबाबदारी कंत्राटदारावर होती. या प्रकरणात हलगज करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. याबाबत चौकशी समिती नेमण्यात येईल असे मनपा आयक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. 

सिध्दार्थ उद्यान सात दिवस बंद 

सिद्धार्थ उद्यान शॉपिंग कॉम्लेक्समधील अर्धवट सोडलेल्या सर्व कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल. यामुळे सात दिवसांकरिता सिद्धार्थ उद्यान बंद ठेवून ही सर्व कामे करण्यात येतील. कामांची पाहणी विशेष समिती करेल. शहरात या प्रकारे जेथे कुठे बीओटीची कामे आहेत त्यांचीदेखील पाहणी करण्यात येईल, असे मनपाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »