भीषण आगीत घरातील साहित्य जळून खाक; गावकऱ्यांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली

डोणगाव :  अचानकपणे लागलेल्या आगीत घरातील धान्य व इतर साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. मेहकर तालुक्यातील डोणगावनजीक असलेल्या बेलगावात मंगळवारी उत्तररात्री ही घटना घडली. दरम्यान, गावकऱ्यांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली.  

बेलगाव येथील निवृत्ती इंगळे (65वर्ष) यांच्या घराला ही आग लागली. उन्हाळा असल्याने इंगळे कुटुंब घराबाहेरील झाडाखाली झोपलेले होते. दरम्यान, घरात अचानकपणे आग लागल्याचे गावातील रहिवासी शेख सैयदा भाई यांनी पाहिले असता त्यांनी आरडाओरड केली. यामुळे, इंगळे कुटुंबाला जाग आली. परंतु, तोपर्यंत आगीने रोद्ररूप धारण केले होते. इंगळे यांच्या घरातील धान्ये व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. दुसरीकडे गावामध्ये जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू असल्याने विहिरीमध्ये पाणी नव्हते. दरम्यान, आग विझवण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ झाली. मारुती बोरकर यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिल्याने आग आटोक्यात आणली. याघटनेत गावकऱ्यांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली. सकाळी महसूल विभागाच्या पथकाने  घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. आगीचे कारण मात्र, समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »