dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ॲपे आणि चारचाकीचा अपघात; मजूर महिला ठार!  

लोणार: शेतात जात असताना ॲपे आणि चारचाकी वाहनाचा अपघात होवून मजूर महिला ठार झाल्याची धक्कादायक घटना लोणार येथून समोर आली आहे. 

लोणार: शेतात जात असताना ॲपे आणि चारचाकी वाहनाचा अपघात होवून मजूर महिला ठार झाल्याची धक्कादायक घटना लोणार येथून समोर आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार  १ फेब्रुवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास स्विफ्ट डिझायरने ॲपेला जोरदार धडक दिल्याने ॲपेचा चुराडा झाला. यात एक महिला ठार झाली. तर काही महिला जखमी झाल्या.  लोणार तालुक्यातील  एका  शेतात कामासाठी जात असताना   सकाळी ८.३० वाजता  सरस्वती–मातमळ गावाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावर हिवराखंडकडे जाणाऱ्या MH 43 AF 5821 क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट कारने MH 20 R 2211 क्रमांकाच्या ॲपेला जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपेमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर  स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. लोणार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी गाठले. जखमी महिलांना रुग्णवाहिकेद्वारे लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top