dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी; कोर्ट परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला 

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यांत आली आहे. हा  धमकीचा मेल चेन्नई येथून आल्याचे सांगण्यात येत असून औरंगाबाद उच्च न्यायालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याशिवाय नागपूर खंडपीठाच्या ऑफिशियल ई-मेल आयडीवर ‘मद्रास टायगर’ या नावाने बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

या बाबद अधिकची माहिती अशी, मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी 12 च्या सुमारास हा धमकीचा मेल आला होता. धमकीचा मेल आल्याची माहिती उच्च न्यायालय प्रशासनाने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त डॉ. रणजीत पाटील, निरीक्षक कृष्णा शिंदे, हायकोर्ट सुरक्षाधिकारी कुंदन जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे शिवचरण पांढरे तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचे चार पथके, एटीएसचे पथक खंडपीठात दाखल झाले.

न्यायालयाच्या संपर्ण परिसरात तपासणी सरू असन कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत आणि प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच न्यायालयातील कामकाज देखील नियमित सुरू ठेवण्यात आले आहे. पोलिस यंत्रणा त्यांचे काम करत असून न्यायालयातील कामकाज तसेच ज्यांना न्यायालयात जायचे आहे अशांना देखील उपस्थित राहू दिले जात आहे. सायबर पोलिसांकडून धमकीच्या मेलची चौकशी सुरू आहे.

मद्रास टायगर या नावाने धमकी

मद्रास टायगर या नावाने इतर काही शहरांतील उच्च न्यायालयांच्या इमारतींना देखील स्फोटाने उडवून देण्याची धमकी याआधी मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास सायबर पोलिस विभागाकडे सोपविण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top