चिखली – बुलढाणा रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार पती पत्नी जागीच ठार

चिखली : बुलढाणा येथील आराध्या लॉनवर आयोजित लग्न समारंभ आटोपून चिखलीकडे दुचाकीवरून निघालेल्या पती पत्नीच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 20 एप्रिलच्या रात्री 9 वाजेदरम्यान केळवद फाट्याजवळ घडली. अपघातानंतर घटनास्थळावर चुराडा झालेली दुचाकी व दूर शेतात घुसलेली कार पाहून अपघाताची भीषणता लक्षात येते.

चिखली : बुलढाणा येथील आराध्या लॉनवर आयोजित लग्न समारंभ आटोपून चिखलीकडे दुचाकीवरून निघालेल्या पती पत्नीच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 20 एप्रिलच्या रात्री 9 वाजेदरम्यान केळवद फाट्याजवळ घडली. अपघातानंतर घटनास्थळावर चुराडा झालेली दुचाकी व दूर शेतात घुसलेली कार पाहून अपघाताची भीषणता लक्षात येते.

   चिखली येथील संभाजीनगर भागातील रहिवासी गणेश गायकवाड हे पत्नी उषा यांच्यासोबत  रविवारी बुलढाणा येथे आयोजित लग्न समारंभाला आले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर रात्री साढे आठ वाजेदरम्यान ते आपल्या दुचाकीवरून चिखलीकडे निघाले होते. दरम्यान केळवद फाट्यावर त्यांची दुचाकी पोहचताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर पती पत्नी सुमारे २० ते २५ फूट हवेत उडून रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला धडकून खाली पडल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. मूळचे  चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत येथील हे गायकवाड दांम्पत्य चिखली येथील संभाजीनगरमध्ये राहत होते. गणेश गायकवाड हे मलगी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. अपघातानंतर कार देखील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात घुसली. अपघातात कारचा समोरील भाग पूर्णत : क्षतीग्रस्त झालेला आहे. या भीषण अपघातास जबाबदार असणारा कारचालक हा कार घटनास्थळावर सोडून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अधिक तपास चिखली  पोलीस करीत आहेत.

दैव बलवत्तर म्हणून चिमुकलीचे प्राण वाचले

गायकवाड दांम्पत्याला दोन अपत्य असून मोठा मुलगा चौदा वर्षाचा तर मुलगी सहा वर्षाची आहे. लग्न समारंभासाठी येताना गायकवाड दांम्पत्याने आपल्या सहा वर्षीय चिमुकलीला सोबत आणले होते. ती दिवसभर त्यांच्यासोबत होती. लग्न समारंभाचा आनंद तिने घेतला. लग्न समारंभाला उशीर झाल्याने गायकवाड दांम्पत्याने तिला तिच्या मामाकडे ठेवले व ते पती पत्नी चिखलीकडे निघाले होते. चिमुकलीचे दैव बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले.

पळसखेडमध्ये एकही चूल पेटली नाही

या दुदैवी घटनेची माहिती पळसखेड दौलत गावात पोहचताच गाव शोकसागरात बुडाले. गावात एकही चूल पेटली नाही. गणेश गायकवाड यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने गावातील प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत होता. सोमवारी शोकाकूल वातावरणात गणेश गायकवाड व उषा गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »