dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात महिलेची निर्घृण हत्या; लैंगिक अत्याचारानंतर दगडाने ठेचल्याचा संशय

वाशिम : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीने एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिच्या डोक्यावर दगड घालून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि. ०९)दुपारी उघडकीस आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मृत महिला अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयोगटातील असून ही घटना काल रात्री घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अत्याचारानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच आरोपीने महिलेची हत्या केल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा तसेच रेल्वे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात तपास सुरू करण्यात आला आहे.

सध्या मृत महिलेची ओळख पटलेली नसली, तरी तिच्या हातावर ‘छाया मोहन’ असे नाव आढळून आले आहे. प्राथमिक माहितीनुसार ही महिला बाहेरील जिल्ह्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून तिची ओळख पटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top