dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दोन कारची समोरासमोर धडक;  युवती ठार, दोन जण गंभीर जखमी

पाडळी :  बुलढाणा- अजिंठा रोडवर मिलिटरी स्कूल जवळ दोन कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात एक युवती ठार झाली तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. 

पाडळी :  बुलढाणा- अजिंठा रोडवर मिलिटरी स्कूल जवळ दोन कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात एक युवती ठार झाली तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. 

मृतक  बुलढाणा तालुक्यातील पाडळी येथील  प्रतीक्षा विवेक शिरसाट आहे. बुलढाणा हून पाडळीकडे येणाऱ्या अल्टो कार (क्रमांक एम एच 12 ए एन 9666) ला दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात कार मधील 14 वर्षाची मुलगी प्रतीक्षा विवेक शिरसाट ही जागीच ठार झाली  व तीचे वडील विवेक संतोष शिरसाट (वय 40 वर्ष),   व आई किरण विवेक शिरसाट (वय 35 वर्ष) गंभीर जखमी झाले. त्या दोघांना जखमी अवस्थेत सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top