कारमधून गुटख्याची वाहतूक;  पोलिसांनी पकडला 12 लाखांचा मुद्देमाल

जालना :  राज्यात बंदी घालण्यात आलेल्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री जालना जिल्ह्यात सर्रासपणे  सुरूच आहे. दरम्यान, जालना  शहरात अवैधपणे विक्रीसाठी चक्क कारमधून  आणण्यात येत असलेला गुटखा पोलिसांनी सापळा रचून पकडला. चंदनझिरा पोलिसांनी शनिवार, 20 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता राजूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

जालना :  राज्यात बंदी घालण्यात आलेल्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री जालना जिल्ह्यात सर्रासपणे  सुरूच आहे. दरम्यान, जालना  शहरात अवैधपणे विक्रीसाठी चक्क कारमधून  आणण्यात येत असलेला गुटखा पोलिसांनी सापळा रचून पकडला. चंदनझिरा पोलिसांनी शनिवार, 20 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता राजूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. 

     या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनासह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

         चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी नेमलेल्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, राजूर रोडवरून एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा जालना शहरात विक्रीसाठी आणला जात आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने राजूर रोडवर सापळा रचून छापा टाकला. छाप्यात टाटा इंडीगो मांझा ( एम एच 02 बीआर 7497 ) या चारचाकी वाहनात मिराज, बाबा, रजनीगंधा, राजनिवास, सिग्नेचर, आरएमडी आदी कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, अधिक गुटखा वाहतूक करता यावी यासाठी वाहनाच्या पाठीमागील सीट काढून टाकून खास रचना करण्यात आल्याचे कारवाईदरम्यान निदर्शनास आले.

या प्रकरणात मोहम्मद तौसीफ अब्दुल रज्जाक ( रा. टट्टूपूरा जालना ), अब्दुल खालेद अब्दुल कादर ( रा. बागवान मस्जिद जवळ, जुना जालना )  या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुढील कारवाईसाठी अन्न सुरक्षा अधिकारी, जालना यांना पत्र देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुब वेताळ, पोहेकॉ कृष्णा तंगे, अभिजीत वायकोस, रविंद्र देशमुख, राजू पवार व पो.कॉ. सुनील पगार सहभागी होते.

 जालना गुटख्याचे केंद्र

राज्यात गुटखा बंदी नव्हती तेव्हा 2012 पूर्वी जालना शहरात गुटखा उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या होत्या. मात्र, राज्यात यावर बंदी घालण्यात आल्यावर या कंपन्या बंद करण्यात आल्या. असे असले तरी जालन्यात राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर गुटखा आणून विकला जातो. काही वर्षांपूर्वी तर छत्रपती संभाजीनगर – जालना महामार्गावर एका ठिकाणी गुटखा निर्मितीचा अड्डा उघडकीस आला होता. दरम्यान, जालन्यात महिन्याला कोट्यवधींचा अवैध गुटखा आणला जात असल्याचे बोलले जाते. जालना हे आजही गुटख्याचे केंद्र असल्याचे बोलले जाते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »