dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Mehkar vote counting: मेहकर विधानसभा मतदारसंघा महायुतीचे संजय रायमुलकर यांची ५०९ मतांनी आघाडी !

Mehkar vote counting: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, प्रथमतः सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये मेहकर विधानसभेत महायुतीचे संजय रायमुलकर ५०९ आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Mehkar vote counting

बुलढाणा: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, प्रथमतः सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये मेहकर विधानसभेत महायुतीचे संजय रायमुलकर ५०९ आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नऊ टेबल वरून पोस्टल मते मोज ली जात आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी 14 टेबल याप्रकारे एकूण 98 टेबल वरून जिल्ह्यातील सात मतदारसंघाची मतमोजणी होत आहे.

मतदारांच्या संख्येनुसार फेऱ्या होणार आहेत. मलकापूरमध्ये २२, बुलढाण्यात २४, चिखलीमध्ये २३, सिंदखेड राजात २५, मेहकरमध्ये २५, खामगावात २३. जळगाव जामोदमध्ये २३ याप्रमाणे मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. प्रथम टपाली मतांची मोजणी होत आहे. मतदानाचा दिवस असल्याने राजकीय पक्षांसह तमाम मतदारांमध्ये उत्सुकता आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होत असून, महायुतीचे उमेदवार संजय रायमुलकर आणि महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात यांच्यात मुख्य लढत होत आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रथमतः टपाली मतदानाची मोजणी होत आहे. यामध्ये महायुती शिंदे शिवसेनेचे उमेदवार संजय रायमुलकर ५०९ मतांनी आघाडीवर असल्याचे पाहायला मिळतेय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top