जाफ्राबाद : येथील सिध्दार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम सर्जे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी स्वच्छता, अंधश्रध्दा निर्मूलन व समाजप्रबोधनासाठी संपूर्ण जीवनभर कार्य केल्याचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे अनुकरा करुन समाजसेवेत सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी प्रा. एस.आर.पहारे, प्रा. अनिल वैद्य, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.पी. जगतवाड, प्रा. सरिता मणियार यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.