dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मनोज जरांगे यांच्या हत्येसाठी अडीची कोटीची डील !

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीमध्ये, जरांगे यांना जिवे मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी समर्थक गंगाधर काळकुटे यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्याकडे तक्रार दिली, त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत राजकीय शक्तीचा हात आहे का? यासंदर्भात मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दादा गरुड आणि अमोल खुणे असे पोलीसांनी याप्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे आहेत. यातील खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचे चौकशीत समोर आले असून, पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीमध्ये जरांगे पाटलांच्या परिचयातील काही जण उपस्थित होते. या बैठकीदरम्यान जरांगे यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरल्याची चर्चा आहे. याबाबत माहिती मिळताच जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतरीत्या कोणतेही नाव अद्याप जाहीर केलेले नाही. राज्यात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या चळवळीचे प्रमुख चेहरे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठं आंदोलन झालं आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर येणे, ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top