Former State Minister Gade passed away: माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांचे निधन

Former State Minister Gangadhar Gade

Former State Minister Gade passed away: पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे (76) यांचे शनिवार 4 मे रोजी सकाळी 4.30 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची मोठी हानी झाल्याच्या सहवेदना व्यक्त होत आहेत.

Former State Minister Gangadhar Gade
Former State Minister Gangadhar Gade

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकर चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे (76) यांचे शनिवार 4 मे रोजी सकाळी 4.30 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची मोठी हानी झाल्याच्या सहवेदना व्यक्त होत आहेत.
गंगाधन गाडे यांचे पार्थिव रविवार 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी 4 वाजता त्यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यसंस्कार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »