‘नायलॉन मांजा’ चा साठा करुन विकणारे 5 जण गजाआड ; 2 लाख 70 हजार रुपयांचे 300 गट्टू जप्त

छत्रपती संभाजीनगर :  पर्यावरणास आणि मानवी जीवितास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या दोन जणांवर गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवार, 15 डिसेंबर रोजी रात्री कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या ताब्यातून 2 लाख 70 हजार किंमतीचे 300 गट्टू जप्त केले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मंगळवार, 16 डिसेंबर रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्रांश संतोष बुरसे (22 वर्ष), रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर, भागवत अंबादास जाधव (20 वर्ष), रा. जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी, बजाजनगर, रोहन राजेंद्र डेंगळे (20 वर्ष), रा. छत्रपतीनगर, बजाजनगर, संदीप राजू डोईफोडे (20 वर्ष), रा. वडगाव कोल्हाटी, एमआयडीसी वाळूज परिसर, राज विनोद जगताप (20 वर्ष), रा. डिंबरगल्ली, बेगमपुरा अशी नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्यांची नावे आहेत. नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्यां टोळक्याच्या ताब्यातून पोलिसांनी 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, पोलिस अंमलदार विजय निकम, योगेश नवसारे, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, अक्षय नारकर, शाहरुख शेख, दिनकर आवारे, तातेराव शिनगारे, सोमनाथ डूकले, महिला पेालिस अंमलदार संजीवनी शिंदे आदींच्या पथकाने केली. नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्याविरुध्द अनुक्रमे एमआयडीसी वाळूज आणि बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »