dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कामगारांना घेऊन जाणारा पिकअप पलटी ; एक ठार, १८ जखमी : राजूर -टेंभुर्णी महामार्गावरील घटना

अकोलादेव : जालना जिल्ह्यातील राजुर- टेंभुर्णी महामार्गावरील गाडेगव्हाण फाट्याजवळ कामगारांना घेऊन जाणारा पिकअप पलटी झाल्याने एक ठार तर १८ जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी ८.३०  वाजेच्या दरम्यान घडली.

मृतक रमेश जाधव

अकोलादेव : जालना जिल्ह्यातील राजुर- टेंभुर्णी महामार्गावरील गाडेगव्हाण फाट्याजवळ कामगारांना घेऊन जाणारा पिकअप पलटी झाल्याने एक ठार तर १८ जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी ८.३०  वाजेच्या दरम्यान घडली.

 रमेश जाधव (५५) हे या अपघातात ठार झाले आहे.  पिकअप (एम.एच ०६ एजी ४८७७) अद्रक काढणाऱ्या  मध्यप्रदेशातील २१ कामगारांना

 घेऊन जात होता. राजूर टेंभुर्णी मार्गावरील गाडेगव्हाण फाट्याजवळ एका स्कूटीला (एम.एच. २१, सी.एफ. ६९३४) वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव पिकअप पलटी झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात विक्रम आवासे (१४), गणेश आवासे (३०), देवी सिंग (४०),  खुमान सिंग (३०), बिलतीबाई सिंग (२५), महेश सिंग (१६), आकाश चव्हाण (३०), समीर नार्वे (१०), परी आवासे (३), अनिता आवासे  (१९) , बळीराम आवासे (१६) , रोहीत चव्हाण (१८), रंजना चव्हाण (१३), राधीका सोळंके (६ ), मोलीबाई आवासे (५०), ऐपल किसके (२४), राजाराम दावत (३०), रूपसिंग आवासे (३२) सर्व रा. मध्यप्रदेश हे जखमी झाले आहे. या सर्व जखमींना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून जालना येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top