dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दुचाकींची समोरासमोर धडक; विद्यार्थिनीचा मृत्यू: डोंगरशेवली गावात शोककळा 

बुलढाणा : कॉलेजला जात असताना समोरून दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंगरशेवली गावाजवळ १६ डिसेंबर रोजी सकाळी घडली. 

बुलढाणा : कॉलेजला जात असताना समोरून दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंगरशेवली गावाजवळ १६ डिसेंबर रोजी सकाळी घडली. 

ॠतूजा सावळे(१९ वर्ष, रा. डोंगरशेवली) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती  बुलढाणा येथील राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती.  सकाळी महाविद्यालयाला जात असतानाच समोरून येणार्‍या दुचाकीने ॠतूजाला धडक दिली. एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके बसला धडकले आणि  ती खाली कोसळली. यात गंभीर जखमी झाल्यांनतर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले होते.  मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ॠतूजाला मृत घोषीत केले. यामुळे संपूर्ण महाविद्यालय व डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे. तिच्या  निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ॠतुजा एमबीबीएस साठी  सुध्दा पात्र झाली होती. 

डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अर्ध्यावर

ऋतुजाचे वडील गणेश सावळे हे पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी तिला परदेशात पाठविण्याच्या तयारीत होते. आईवडीलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ऋतुजाने प्रचंड मेहनत घेतली. तिच्या वडीलांनी सुध्दा तिला डॉक्टर बनविण्यासाठी खुप प्रयत्न केले. डॉक्टर व्हावी यासाठी ॠतुजाला परदेशात सुध्दा पाठविण्याची तयारी गणेश सावळे यांची होती. परंतू डॉक्टर होण्याचे स्वप्न अर्ध्यावर राहिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top