Firing in Akola: अकोल्यात गोळीबार: तलवार, पाईचा वापर करत दोन गटात तुफान राडा

Firing in Akola

Firing in Akola: अकोल्यातील कृषीनगर भागात दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे.‌ दोन गटात झालेल्या या राड्यामध्ये गोळीबारासह तलवारी आणि पाईपचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता सतीश वानखडे हा गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, या संपूर्ण वादात दोन्ही गटातील सुमारे ८ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Firing in Akola
अकोला : अकोल्यातील कृषीनगर भागात दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे.‌ दोन गटात झालेल्या या राड्यामध्ये गोळीबारासह तलवारी आणि पाईपचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता सतीश वानखडे हा गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, या संपूर्ण वादात दोन्ही गटातील सुमारे ८ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्चस्वाच्या लढाईतून आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात तुफान राडा झाल्याची माहिती मिळाली आहे. या राड्यात तलवारीसह बंदुकीचा देखील वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. यामध्ये सतीश वानखडे हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, घटनास्थळावर २ जिवंत काडतूसे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. तर एक गोळी हवेत फायर झाल्याची माहिती आहे.

घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

जखमींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज रात्री सात वाजता सुमारास आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाला होता. हा वाद इतका भयंकर होता की परिसरातील नागरिक आणि कृषी नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे. दोन्ही गट वंचितच्या कार्यकर्त्यांचे आहेत. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, या वादानंतर काहीजण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलीस सर्वांचे ओळख पटवण्याचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »