शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आलोय : उध्दव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर :  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आलो असून राजकारण करण्यासाठी आलो नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी धराशिव जिल्ह्यातील भूम येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना सांगितले.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवू असे आश्वासन राज्यसरकारने दिले होते. परंतु दिवाळी संपून जवळपास दहा ते बारा दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज्यातील दगाबाज सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे चार दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्याला बुधवारपासून सुरुवात झाली. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी उध्दव ठाकरे यांनी बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे निंबाळकर, मराठवाडा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेल्या मंत्र्यामध्ये एक गृहकलह मंत्री, एक अनर्थ मंत्री आणि एक नगरभकास मंत्री असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता यावेळी केली. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »