बुलढाण्यातील ड्रायफ्रूट्सच्या दुकानात ‘अग्नितांडव’!

बुलढाणा :  बुलढाणा शहरातील सर्कुलर रोड परिसरात एका फ्रुटच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.  शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर येत आहे. 

बुलढाणा :  बुलढाणा शहरातील सर्कुलर रोड परिसरात एका फ्रुटच्या दुकानाला आग लागल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.  शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर येत आहे. दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा उठू लागताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा नगरपालिकेचे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी प्रसंगावधान राखत वेगाने कारवाई करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी वित्तहानी आणि संभाव्य अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »