dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

BJP’s win  Ambad : अंबडला भाजपाचा नगराध्यक्ष ; नगरपालिकेत एकहाती सत्ता

BJP’s win  Ambad :  येथील नगर पालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विजयी झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी कुलकणी या निवडून आल्या असून भाजपचे 14 तर मित्रपक्ष रासपचे 2 उमेदवार विजयी झाले आहे. या नगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता ताब्यात घेत पक्षाचे वर्चस्व सिध्द केले आहे.

BJP's win  Ambad

अंबड : येथील नगर पालिकेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विजयी झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी कुलकणी या निवडून आल्या असून भाजपचे 14 तर मित्रपक्ष रासपचे 2 उमेदवार विजयी झाले आहे. या नगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता ताब्यात घेत पक्षाचे वर्चस्व सिध्द केले आहे. रविवारी सकाळी 11.45 पर्यंत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकालानंतर विजयी उमेदवार, समर्थकांनी ढोलताशाच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला.

जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर नगरपालिकांसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडली होती. न्यायालयाच्या आदेशाने निवडणुक निकाल लांबला होता. रविवारी अंबड नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी झाली. यामध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदासह 14 तर मित्रपक्ष रासपचे 2 असे 16 नगरसेवक विजयी झाले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या सर्वसाधारण गटातील उमेदवार देवयानी केदार कुलकर्णी या 13 हजार 423 मतांनी विजयी झाल्या आहे. विजयी नगरसेवक उमेदवार याप्रमाणे – प्रभाग 1 ज्योती बाबर (भाजप) गंगाधर वराडे (भाजप), प्रभाग 2 सविता कुलकर्णी (भाजप), उज्वल कुचे (भाजप), प्रभाग 3 विश्वजित खरात (भाजप), ताराबाई शहाणे (भाजप), प्रभाग 4 अर्जुन भोजने (राष्ट्रवादी श.प), आस्मा परवीन पठाण(राष्ट्रवादी श.प), प्रभाग 5 मंगलबाई खरात (भाजप), बंडू जाधव (भाजप), प्रभाग 6 रासपचे सचिन खरात व शेख बदुनिस्साबेगम, प्रभाग 7 नुरजहाँ हाश्मी (काँग्रेस), शेख फेरोज (भाजप), प्रभाग 8 पद्माबाई वराडे (भाजप), केदार कुलकर्णी (भाजप), प्रभाग 9 ललिता बुर्ले(राष्ट्रवादी श.प), संदिप खरात(राष्ट्रवादी श.प), प्रभाग 10 रंजना खरात (भाजप), राम लांडे(राष्ट्रवादी अ.प.) तर प्रभाग 11 मधून सावित्री गुढे (भाजप), विठ्ठल राणा (भाजप) हे उमेदवार विजयी झाले आहे.

मित्रपक्ष आणि विरोधकांचा पराभव

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि काँग्रेस पक्षाला केवळ एक-एक जागेवर समाधान मानावे लागले. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागेवर विजयी मिळवला आहे. भाजपने रासप वगळता सत्तेतील मित्रपक्षासोबत युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top