बुलढाणा : शेतकरी कर्जमाफी, सोयाबीन कापूस उत्पादनाला भाव यासह इतर प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाण्यात २ मे रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चा ने जिल्हा मुख्यालय बुलढाणा दणाणून गेले होते. शेकडो ट्रॅक्टर घेवून शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाव धडकले होते.

बुलढाणा : शेतकरी कर्जमाफी, सोयाबीन कापूस उत्पादनाला भाव यासह इतर प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाण्यात २ मे रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चा ने जिल्हा मुख्यालय बुलढाणा दणाणून गेले होते. शेकडो ट्रॅक्टर घेवून शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाव धडकले होते.
शहरातील टिळक नाट्य मंदिरासमोरील मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. पुढे, संगम चौक, जयस्तंभ चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिवसेना (उबाठा) शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. त्याआधी जिजामाता प्रेक्षागार जवळील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानात रणरणत्या उन्हात जाहीर सभा पार पडली. सभेत झालेल्या जाहीर भाषणातून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख बुधवंत आणि आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. नरेंद्र खेडेकर म्हणाले की निवडणुकीच्या वेळेस भूलथापा देऊन शेतकऱ्यांची मते घेतल्या जातात हे दुर्दैवी आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी निवडणूक होवून गेल्या, त्यात शेतकऱ्यांना विविध प्रकारची खोटी आश्वासने दिली. सत्तेत आल्यानंतर मात्र, सरकारने दिशाभूल केली. यामुळे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देत आहे.
नेत्यांवरील खर्च कमी करा, कर्जमुक्तीचा विचार करा : जयश्री शेळके
विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. यावेळी जयश्री शेळके यांनी
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारी वाचून दाखवत मंत्र्यांवरचा खर्च कमी करा,
जाहिरात बाजी खर्च कमी करा पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा
कर्जमुक्तीचा आंदोलनाचा वणवा पेटवत आहे. या वणव्यात हे महायुती सरकार भस्मसात होईल असे पक्षाच्या प्रवकत्या जयश्री शेळके यांनी सांगितले.
सरकारने शब्द फिरवला : बुधवत
आपला देश कृषिप्रधान आहे. मात्र गेली अनेक वर्षे झाले शेतकऱ्यांच्या हिताचा विचार झालेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. बेरोजगारी वाढली आहे. गावागावात प्यायला पाणी नाही. सरकारने जुमला करून, वेगवेगळी आश्वासने करून निवडणुका जिंकल्या, मात्र आश्वासनांची पूर्तता होत नाही. कर्जमाफीचे आश्वासन दिले मात्र आता त्यावरून सरकारने शब्द फिरवला असल्याचा आरोप बुधवत यांनी केला.