Fake Bengali doctor arrest in Khamgaon:खामगावात बोगस बंगाली डाॅक्टरचा भांडा फोड; गुन्हा दाखल 

Fake Bengali doctor arrest in Khamgaon:शहरातील जुना फैल भागामध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या कलकत्ता येथील बोगस डॉक्टरास शिवाजीनगर पोलिसांनी छापा मारून गजाआड केल्याची घटना 5 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. 

खामगाव : शहरातील जुना फैल भागामध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या कलकत्ता येथील बोगस डॉक्टरास शिवाजीनगर पोलिसांनी छापा मारून गजाआड केल्याची घटना 5 डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

 शिवाजीनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, शहरातील जुना फैल भागामध्ये माँ क्लीनिक नावाने एक बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समजले. सदर माहितीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे, पोहेको नीलसिंह चौहान, एनपिसि अरविंद बडगे, पोको गायकवाड, केशव झाल्टे, शैलेश राजपूत  या पथकाने पाच डिसेंबर रोजी दुपारी माँ क्लिनिक या दवाखान्यावर छापा मारला यावेळी त्या ठिकाणी डॉ. कौशिक टीकादार नामक व्यक्ती रुग्णांवर औषधोपचार करताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याच्या जवळील वैद्यकीय उपचाराची पदवीची तपासणी केली असता त्याच्याजवळ बीआयएमएस  नामक पदवी आढळून आली. पोलिसांनी सदर पदवी बाबत येथील वैद्यकीय अधीक्षकांकडे चौकशी केली असता सदर पदवी ही अवैध असल्याचे समजले त्यामुळे पोलिसांनी सदर बोगस डॉक्टर कौशिक टीकादार यास  ताब्यात घेऊन दवाखान्यातील सर्व साहित्य जप्त केले आहे. सदर बोगस डॉक्टरला पोलीस स्टेशनमध्ये आणलेले असून शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. शहरातील अनेक दाट वस्तीच्या भागांमध्ये तसेच गल्लीबोळामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू असून कुठलीही वैध पदवी नसताना बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. याकडे  वैद्यकीय विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »