ऐन दिवाळीत पोलिस निरिक्षकांच्या बदल्यांचा धमाका: पोलिस आयुक्त प्रविण पवार यांचा निर्णय 

छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळीत पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी शहरातील सर्वच पोलिस निरिक्षकांच्या बदल्या करण्याचा आदेश काढून मोठा धमाका केला आहे. यात मुख्य गुन्हे शाखा, सायबर पोलिस ठाणे, आमली पदार्थ विरोधी पथक आदींचा समावेश आहे. 

छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळीत पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी शहरातील सर्वच पोलिस निरिक्षकांच्या बदल्या करण्याचा आदेश काढून मोठा धमाका केला आहे. यात मुख्य गुन्हे शाखा, सायबर पोलिस ठाणे, आमली पदार्थ विरोधी पथक आदींचा समावेश आहे. 

पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी वर्षभरातच शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांची उचल बांगडी केली आहे. यापूव मार्चपूव या बदल्या करण्यात आल्या होत्या मात्र आता पुन्हा सहा महिन्यात या निरिक्षकांची आदलाबदली केल्याने पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चेला सुरूवात झाली आहे. या बदल्यांमध्ये एमआयसीडी सिडकोचे पो.नि.गजानन कल्याणकर यांना आता गुन्हे शाखा देण्यात आली आहे. सायबरचे पो.नि.शिवचरण पांढरे आता वाळुज पोलस ठाणे, हर्सुल पो.ठा.च्या पो.नि.सुनिता मिसाळ या भरोसा सेल, उस्मानपूरा पो.ठा.चे पो.नि. अतुल एरमे हे सिडको पो.ठा येथे, नियंत्रण कक्षाचे पो.नि. संग्राम ताठे आता उस्ममानपूरा पो.ठा., वाळुज पो.ठा.पो.नि. राजेंद्र सहाणे यांना वाचक शाखा पो.नि., नियंत्रण कंक्षाचे पो.नि.सोमनाथ जाधव हे सायबर पो.ठा., विशेष शाखेच्या पो.नि.स्वाती केदार या हर्सुल पो.ठा.पो.नि., नियंत्रण कक्षाच्ो पो.नि. श्रीनिवास रोयलावार सीटी चौक (दुय्यम), भरोसा सेलच्या पो.नि. तेजश्री पाचपुते या नियंत्रण कक्षाच्या पो.नि., नियंत्रण कक्षाचे शिवाजी तावडे हे आता पोलिस कल्याण विभाग, नियंत्रण कक्षाचे राजेश मयेकर हे आता पीटीसी सेल येथे, सिडको पो.ठा.पो.नि. कुंदकुमार वाघमारे आता नियत्रण कक्ष येथे, नियंत्रण कक्षाचे नरेंद्र पाडळकर आता विशेष शाखा येथे, एनडीपीएसच्या गिता बागवाडे या आता एमआयडीसी सिडको येथे पो.नि., विशेष शाखेचे पो.नि. अविनाश आघाव अतिरिक्त कार्यभार वाहतूक शाखा सिडको येथे, जिन्सी पो.ठाण्याचे तात्पुरते पो.नि. शिवाजी बुधवंत यांना कायम करण्यात आले आहे. तर जवाहरनगर पो.ठाण्याचे सचीन कुंभार यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »