Encounter in Sukma, Chhattisgarh; 10 Naxalites killed :  छत्तीसगडच्या सुकमात चकमक; 10 नक्षली ठार 

Encounter in Sukma, Chhattisgarh; 10 Naxalites killed

Encounter in Sukma, Chhattisgarh; 10 Naxalites killed : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांना ठार केले. यावेळी सर्व मृतदेह व 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

Encounter in Sukma, Chhattisgarh; 10 Naxalites killed

सुकमा (छत्तीसगड) :  छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांना ठार केले. यावेळी सर्व मृतदेह व 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई म्हणाले की, मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात आहोत. जिल्ह्यातील भेज्जी पोलिस स्टेशन हद्दीतील कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम आणि भंडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. कोंटा आणि किस्टाराम एरिया कमिटीचे नक्षलवादी जिल्ह्याच्या दक्षिण भागात असल्याच्या माहितीवरून जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे संयुक्त पथक रवाना करण्यात आले. भेज्जी पोलिस स्टेशन हद्दीतील कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम आणि भांडारपदर गावातील जंगल-डोंगराळ भागात हे पथक असताना नक्षलवाद्यांनी डीआरजी टीमवर गोळीबार सुरू केला. यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांनी या भागात आतापर्यंत १० नक्षलवाद्यांचे मृतदेह, इन्सास रायफल, एके ४७ रायफल, एसएलआर आणि इतर अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. चकमकीबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. छत्तीसगडमधील बस्तर भागात सुरक्षा दलांनी या वर्षी चकमकीच्या विविध घटनांमध्ये 207 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी राज्यातील नक्षलग्रस्त नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते.

2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा खात्मा करणार

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री साई यांनी सुरक्षा दलांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि त्यांचे सरकार नक्षलवादाबद्दल शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करत असल्याचे सांगितले. बस्तरमधील विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे त्यांच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. बस्तरमध्ये शांतता, विकास आणि प्रगतीचे युग परत आले आहे. सुरक्षा दलांच्या अदम्य साहस आणि समर्पणाबद्दल अभिनंदन करताना साई म्हणाले की, छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा खात्मा करणे निश्चित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचे ठरवलेले लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »