Earthquake : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम आणि अकोला या एका जिल्ह्यात बुधवार 10 जुलै रोजी भल्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम आणि अकोला या एका जिल्ह्यात बुधवार 10 जुलै रोजी भल्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा धक्का जाणवला आहे. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीवृतेचा होता. हिंगोली जिल्ह्यांमध्ये पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहरालासुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीत झालेला हा भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.
आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र
सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. या भूकंपाची 4.5 रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
लोणारमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के
शहरात बुधवार, 10 जुलै रोजी सकाळी 07:15, मिनिटांनी सलग दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. 21 मार्च 2024 रोजी सकाळी 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली होती. नांदेड भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोली पासून लोणार अंदाजे 90 कि.मी. तर नांदेड पासून लोणार हे 176 कि.मी. अंतर आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या पाचही तालुक्यात भूकंपाचे धक्के
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात भूकंपाचे जोरदार धक्के बसले,हिंगोली, औंढा नागनाथ,सेनगाव, कळमनुरी, वसमत या तालुक्यात भूकंपाचे जोरदार धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून,सकाळी सव्वासात वाजता जोरदार धक्का,नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे