Dispute between MLAs at the polling station in Khamgaon : आजी माजी आमदारांचा न. प. शाळा क्रमांक दोनच्या बुथवर राडा; काँग्रेस उमेदवार सानंदांचा आक्षेप

Dispute between MLAs at the polling station in Khamgaon

Dispute between MLAs at the polling station in Khamgaon : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट बूथ मध्ये जाऊन मतदारांची मतदान करत असल्याचे चित्र पाहून महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप सानंदा यांनी अक्षय गीत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Dispute between MLAs at the polling station in Khamgaon
खामगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट बूथ मध्ये जाऊन मतदारांची मतदान करत असल्याचे चित्र पाहून महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप सानंदा यांनी अक्षय गीत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याबाबत माहिती मिळताच महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांनी सुद्धा घटनास्थळी पोहोचवून विरोधी उमेदवार बिनबुडाचे आरोप करत मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.
आज 20 नोव्हेंबर रोजी शहरातील सतीफैल स्थित शाळा क्रमांक दोन येथील मतदान केंद्रावर मतदारांकडून उस्फुर्तरित्या मतदान प्रक्रिया पार पडत होती. दुपारी बारा वाजे दरम्यान या ठिकाणी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार दिलीप सानंदा यांनी पोचून बूथच्या आवारामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहून त्या ठिकाणी उपस्थित पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना मतदान बूथ परिश्रमामध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी का आहे. असे म्हणत वाद उत्पन्न केला. यावेळी तातडीने पोलीस विभागाने सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मतदान भूतच्या परिसरातून बाहेर काढले. याबाबत माहिती मिळताच महायुतीचे भाजपचे विद्यमान आमदार उमेदवार आकाश फुंडकर यांनी त्या ठिकाणी पोचून कोणतेही कार्यकर्ते पदाधिकारी मतदान कक्षामध्ये जात नसून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 100% मतदानाकरिता महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्न करीत असल्याचे बोलून ही बाब विरोधी उमेदवाराच्या जिव्हारी लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करून मतदानाचा टक्का घसरून याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार आकाशकुंडकर यांनी या ठिकाणी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »