केदारखेडा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो वारकरी शेकडो मैलांचा पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल होतात. दरम्यान, भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील सायकल संघटनेच्या वतीने भोकरदन ते पंढरपूर अशी 360 किलोमीटरची सायकल वारी काढण्यात येते. गुरुवार, 19 जून रोजी ही सायकल वारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.

दीपक शेजुळ/ केदारखेडा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो वारकरी शेकडो मैलांचा पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल होतात. दरम्यान, भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील सायकल संघटनेच्या वतीने भोकरदन ते पंढरपूर अशी 360 किलोमीटरची सायकल वारी काढण्यात येते. गुरुवार, 19 जून रोजी ही सायकल वारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.
भोकरदन ते पंढरपूर सायकल वारीचे हे तिसरे वर्ष असून यामध्ये टेंभुर्णी, जाफराबाद, वडाळा, ताडकळस, सिपोरा, माहोरा, विरेगाव, भोकरदन व बरंजळा साबळे येथील सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. यामध्ये काही डॉक्टर्स वकील, शिक्षक इतर कर्मचारीवृंद यांचा समावेश आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीला जसे वारकरी पायी दिंडी करतात. त्याच पद्धतीने गेल्या तीन वर्षापासून भोकरदन – जाफराबाद सायकल संघटना यांची सायकलवारी सुरू झाली आहे.
यंदाही ही सायकलवारी भोकरदन येथून गुरुवारी पहाटे पाच वाजता विठुरायाच्या पंढरपूर वारीसाठी रवाना झाली. तीन दिवसांमध्ये हे सायकल वारकरी एकूण 360 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. रोज 120 किलोमीटर प्रमाणे तीन दिवसात पंढरपूर येथे पोहोचणार आहेत. पहिला मुक्काम गेवराई, दुसरा मुक्काम बार्शी आणि तिसरा मुक्काम पंढरपूर येथे होणार आहे. यात भोकरदन-जाफराबाद सायकल संघटनेचे अध्यक्ष पंडित सुरशे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सचिव लक्ष्मण सुरडकर, सहसचिव डॉ राजेश कड, कोषाध्यक्ष डॉ. राहुल चौधरी, निलेश सुरशे, राम जैन, अनिल पिसे, राहुल म्हस्के, ऋषिकेश देशपांडे, उमेश शिरसाठ, नवनाथ खेकाळे व इतर सायकलिस्ट असे जवळपास वीस सायकलिस्ट पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत.