बुलढाणा : ‘टेलिग्राम’ अॅपवर टास्क देवून पैसे कामविण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी मलकापुरातील एका दाम्पत्याची लाखो रुपयांनी फसणूक केली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना बुलढाणा सायबर पोलिसांनी अटक केली असून यातील एकाला चैन्नई येथील सेंट्रल जेलमधून तर दुसऱ्याला सूरत येथून ताब्यात घेतले आहे.

मलकापूर येथील एका नागरिकाने 7 नोव्हेंबर 2023 मध्ये सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार, अज्ञात आरोपींनी ‘टेलिग्राम’ अॅपचा वापर करून पैसे गुंतवणूक करत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. यावर विश्वास ठेवून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीनेही ऑनलाईन पैसे गुंतवले. मात्र, पुढे नफा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे, त्यांनी तातडीने बुलढाणा येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. अनुषंगिक तपासादरम्यान, फसवणुकीसाठी अकाऊंट पुरविणाऱ्या एका जणाचा शोध लागला. मंगुकीया चिरागभाई सावजीभाई(27वर्ष), रा. सूरत असे त्याचे नाव असून, तो चैन्नई येथील सेंट्रल जेलमध्ये असल्याचे पोलिसांना कळाले. तेथून त्याला ताब्यात घेवून पोलीस कोठडी घेतली. तद्नंतर, चौकशीतून दूसरा आरोपीदेखील निष्पन्न झाला. कांझीभाई मगणभाई चौटाला(28 वर्ष, रा. सूरत) यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे. अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात एपीआय प्रमोद इंगळे, एएसआय शकिल खान, पोलीस कर्मचारी राजदीप वानखडे, विक्की खरात, पंढरी सातपुते यांच्या पथकाने केली आहे.