मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करा : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दर हजार मुलांमागे ९२७ मुली असे प्रमाण आहे. मुलींच्या जन्मदरात गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली असली तरी ही वाढ समाधानकारक नाही. यासंदर्भात कायद्याच्या आधारे अपप्रवृत्तींवर कारवाई करणे व मुलींच्या जन्माबाबत समाजाची मानसिकता, दृष्टिकोन बदलवणे या गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करा असे निर्देश्‍ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाशी संबंधित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रुग्ण कल्याण समिती, गर्भलिंगनिदान प्रतिबंधक समिती, सुमन जिल्हास्तरीय समिती अशा विविध विषयांवर आधारीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत बढे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे, ॲड. रश्मी शिंदे, डॉ. प्रज्ञा सोनवणे तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी पुढे म्हणाले की, रुग्ण कल्याण समितीमार्फत रुग्णांसाठी विविध सोई सुविधा राबविल्या जातात. त्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी सढळ हाताने मदत करावी. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती करुन लोकांचे प्रबोधन करावे. ज्या भागात जन्मदर कमी आहे त्या भागात लक्ष केंद्रीत करावे. कारणांचा शोध घ्यावा. अधिक कडक तपासणी करुन अपप्रवृत्तींवर कारवाया कराव्या. जिल्ह्यात सुरक्षित मातृत्वासाठी सुद्धा जनजागृती करावी. माता व बालकांचे आरोग्य चांगले कसे राहिल याबाबत प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »