बुलढाणा: दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना आमदार गायकवाडांनी शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. प्रशांत आंबी यांच्या आई आणि पत्नी संदर्भात केलेल्या शिवीगाळीवरून आमदारांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी पुस्तकाच्या शीर्षकावर त्यांचा आक्षेप कायम आहे.

बुलढाणा: दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना आमदार गायकवाडांनी शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. प्रशांत आंबी यांच्या आई आणि पत्नी संदर्भात केलेल्या शिवीगाळीवरून आमदारांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी पुस्तकाच्या शीर्षकावर त्यांचा आक्षेप कायम आहे. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख झाल्याने पुस्तक प्रकाशक प्रशांत अंबी यांच्यावर कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी, अशी मागणी आता बुलढाण्यातून आ. गायकवाड समर्थकांनी केली आहे. इतकच नाही तर, पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर देखील मरणोत्तर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली. यामुळे हे प्रकरण अधिकच भडकले असून, हे प्रकरण पेटण्याची चिन्हे आहेत.
आमदार गायकवाड यांच्या विरोधात रोहित पवार यांच्या उपस्थितीत उद्या बुलढाण्यात भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चात पुस्तकाचे वाचन करावे, परंतु आमदारांसंदर्भात चुकीचे विधान करू नये अशा आशयाचे निवेदनही पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.


