बुलढाणा : पपई फळाच्या निकृष्ट दर्जाच्या रोपामुळे नुकसान झाल्याने एका शेतकऱ्याने ग्राहक आयोगाकडे कंपनीची तक्रार दिली होती. त्यावरून, रोप विक्रेत्या कंपनीविरोधात आयोगाने कारवाई करित नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

बुलढाणा : पपई फळाच्या निकृष्ट दर्जाच्या रोपामुळे नुकसान झाल्याने एका शेतकऱ्याने ग्राहक आयोगाकडे कंपनीची तक्रार दिली होती. त्यावरून, रोप विक्रेत्या कंपनीविरोधात आयोगाने कारवाई करित नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.
शेतकरी प्रभाकर भास्कर वराडे ( रा. टाकरखेड, ता. नांदुरा) यांनी प्रकरणाची तक्रार दिली होती.
युलीप अग्रीटेक प्रा. ली. आणि अग्रोस्टार कंपनीद्वारे त्यांना पपई पिकाची उशिराने रोपे मिळाली होती. यामुळे, पिकाचे उत्पादन खुटले व त्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यानंतर, शेतकरी वराडे यांनी संबधित कंपनीकडे झालेल्या नुकसानीची तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार देवूनही
नुकसानीची भरपाई न मिळाल्याने अखेर त्यांनी अॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी यांच्यामार्फत बुलढाणा येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार अर्ज सादर केला. तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाच्या अध्यक्षा वैशाली आर. गावंडे आणि सदस्या स्नेहलता पाटील यांनी प्रकरणातील दाखल पुरावे, कागदपत्रे आणि अॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी यांनी सादर केलेल्या युक्तिवादाचा कायदेशीर रीत्या सकारात्मक विचार करून अर्जदार शेतकरी वराडे यांचा अर्ज मंजूर केला. सदरच्या प्रकरणात अर्जदार शेतकरी यांच्यातर्फे अॅड. धिरजकुमार प्रकाशचंद गोठी, अॅड. जीवन एस. गवई, अॅड. तायडे, अॅड. तौफिक शेख, अॅड. पायल भूतेकर, अॅड रहीम शाह, अॅड राहुल दराखे, अॅड. धिरज वावरे, पवन सरकटे, उमेश गाडेकर यांनी काम पाहिले.
नुकसान भरपाई देण्याचे आदेश
निकृष्ट दर्जाचे रोप विक्री केल्याने युलीप अग्रीटेक प्रा. ली. आणि अग्रोस्टार कंपनी यांनी 10 लाख आठ हजार रुपये 6 टक्के व्याजदराने नुकसान भरपाई द्यावी, आदेशित केले. याशिवाय शेतकऱ्यास झालेल्या शाररीक, मानसिक आणि आर्थिक त्रासाबद्दल दहा हजार रपये व प्रकरणाचा खर्च म्हणून सात हजार रुपये भरपाई द्यावी, असे आदेश देण्यात आले आहे