dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महिला विधेयकाच्या आडून मतदार संघ पुनर्रचनेचा घाट : खा. रविंद्र चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत आरोप

परभणी : केंद्रातील भाजपा सरकार महिला आरक्षण विधेयकाच्या आडून लोकसभा, विधानसभा मतदार संघ पुनर्रचनाचा घाट घालत होते. मात्र जनगणना होण्यापूर्वीच कोणतेही नियोजन नसताना इतर राज्यातील निवडणूका डोळ्यासमोर ठेवून महिला आरक्षणाचा मुद्दा काढत होते. मात्र काँग्रेससह सर्व विरोधी पक्षानी भाजपाचे हे षडयंत्र हाणून पाडले, असे प्रतिपादन खा. रविंद्र चव्हाण यानी पत्रकार परिषदेत केले.

परभणी शहरातील सिटी पॅलेस सभागृहात जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवार, २२ एप्रिल रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत खा. रविद्र चव्हाण यांनी महिला आरक्षण विधेयका सदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. काँग्रेसचे दिवगत पंतप्रथान राजीव गांधी यानी महिलांना प्रथम आरक्षण दिले. शिवाय आतापर्यंत देशभरात काँग्रेसने सर्वाधिक महिलाना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची सथी दिली. नुकत्याच १६ व १७ एप्रिल रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्रातील भाजपा सरकारने पुन्हा महिला विधेयक मांडून त्यासोबत परिसिमन करणारे विधेयक जोडले. मात्र महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय २०२३ सालीच घेण्यात आला होता. तेव्हा काँग्रेससह सर्वच पक्षानी या विधेयकाला पाठिबा दिला होता. मग आता पुन्हा यावर सभागृहात चर्चा करण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित करत भाजपावर टिका केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top