चोकर्सचा शिक्का पुसला; दक्षिण अफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन : ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्स राखून विजय 

लॉर्ड्स : चोकर्स म्हणून ज्यांनी आयुष्यभर शिक्का झेलला त्याच दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चषक जिंकत इतिहास रचला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने धुळ चारली आणि जेतेपदाला गवसणी घातली.

लॉर्ड्स : चोकर्स म्हणून ज्यांनी आयुष्यभर शिक्का झेलला त्याच दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चषक जिंकत इतिहास रचला आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने धुळ चारली आणि जेतेपदाला गवसणी घातली. एडन मार्कम यावेळी दक्षिण आफ्रिकेसाठी तारणहार ठरला. ऑस्ट्रेलियाला तो एकटा भिडला आणि देशाला पहिले वहिले विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचे जेतेपद जिंकवून दिले. मार्करमने यावेळी १३६ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. संघाला विजयासाठी फक्त सहा धावा हव्या असताना तो बाद झाला. पण दक्षिण आफ्रिकेने यावेळी ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्स राखत सहजपणे मात केली आणि ते जग्गजेते ठरले.

ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेपुढे २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिका करणार की नाही, ही शंका सर्वांच्या मनात होती. कारण आतापर्यंत त्यांनी बऱ्याचदा ऐनवेळी कच खाल्ली होती. पण आपल्यावर लागलेला चोकर्स हा शिक्का एडन मार्कमच्या शतकाने पुसून टाकला. सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मार्करम बलाढ्य शिलेदारासारखा ऑस्ट्रेलियाच्या विजयाता मार्गात ठामपणे उभा राहीला आणि अभेद्य फलंदाजी करत त्याने जेतेपदाच्या किल्ल्यावर आपल्या देशाचा झेंडा फडकवला. मार्करमला कर्णधार तेंदा बवुमा चांगली साथ देत होता. पण त्याला अखेरपर्यंत मार्करमला साथ देता आली नाही. बवुमाने यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ६६ धावांची खेळी साकारली. पण त्याला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बाद केले.

एडन मार्करम ठरला तारणहार

सामन्याच्या चौथ्या दिवशी शतकवीर एडन मार्करम आणि तेम्बा बवुमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धची जागतिक कसोटी क्रिकेट विजेतेपदाची लढत जिंकण्याची संधी आहे. विजयासाठी २८२ धावांचे आव्हान असलेल्या दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद २१३ अशी मजल मारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »