नवी दिल्ली : राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) शनिवारी नीट यूजी 2025 चा निकाल जाहीर केला. राजस्थानमधील हनुमानगड येथील महेश केसवानीने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याला 720 पैकी 686 गुण मिळाले आहेत. महाराष्ट्रातून कृषांग जोशीने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. आरव अग्रवाल सुद्धा पहिल्या दहामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. इंदोरमधील उत्कर्ष अवधिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पहिल्या 10 मध्ये राजस्थानमधील चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी तीन विद्यार्थी कोटाचे आहेत. राजस्थानचा महेश कुमार ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट- ग्रॅज्युएट’ (नीट-यूजी) मध्ये अव्वल ठरला आहे, तर मध्य प्रदेशचा उत्कर्ष अव्वल ठरला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) शनिवारी ही माहिती दिली. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत बसलेल्या एकूण २२.०९ लाख उमेदवारांपैकी १२.३६ लाखांहून अधिक उमेदवार उत्तीर्ण झाले. तथापी, ही संख्या गेल्या वर्षीच्या १३.१५ लाख यशस्वी उमेदवारांपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी उमेदवारांची संख्याही २३.३३ लाखांहून अधिक होती. महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी आणि दिल्लीचा मृणाल किशोर झा अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिला. मुलींमध्ये दिल्लीची अविका अग्रवाल परीक्षेत अव्वल ठरली आणि राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक मिळवला. पात्र उमेदवारांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशातील (१.७० लाखांहून अधिक) आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील (१.२५ लाखांहून अधिक) आणि राजस्थानमधील (१.१९ लाखांहून अधिक) आहे.