Chhatrapati Sambhajinagar vote counting: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता टपाली मत मोजणीने प्रारंभ झाला. दहा वाजेपर्यंत चार ते पाच फेऱ्या पूर्ण झाले आहेत यामध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे
छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता टपाली मत मोजणीने प्रारंभ झाला. दहा वाजेपर्यंत चार ते पाच फेऱ्या पूर्ण झाले आहेत यामध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण या ११ हजार ७२१ शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे संजय शिरसाठ ९ हजार ४३६ तर मध्य विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल ३ हजार ३४२ मतांनी आघाडीवर आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतमोजणी शनिवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी होत आहे. जिल्ह्यातील सर्वच मतमोजणी केंद्रावर सकाळी आठ वाजता या प्रक्रियेला प्रारंभ झाला. सुरुवातीला टपाली मतदान मोजल्यानंतर क्रमांक एक च्या फेरीपासून पुढे मतमोजणी वेगात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन ते पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून यामध्ये महायुतीचे सर्वच उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुसरीकडे कन्नड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या शिंदे सेनेच्या संजना जाधव विरुद्ध उद्धवसेनेचे उदयसिंग राजपूत या लढतीमध्ये राजपूत १ हजार मतांनी पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. तर गंगापूर विधानसभा मतदारसंघात सतीश चव्हाण यांनी २ हजार मतांपेक्षाही जास्त आघाडी घेतली आहे. पैठण विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेच्या विलास भुमरे यांनी उद्धव सेनेचे दत्ता गोरडे यांना 7 हजार ५२८ मतांनी मागे टाकले आहे.
अतुल सवेंना धक्का एमआयएम आघाडीवर
शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतुल सावे यांना धक्का देणारी घटना समोर येत आहे त्यांच्या विरोधात लढत असलेले एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील तब्बल ३ हजार मतांनी पुढे आहेत तर याच मतदारसंघात समाजवादी चे गफार कादरी आणि वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान हे सुद्धा दोन आकडे मतांवर पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.