Chhatrapati Sambhajinagar : लँडिंग न करताच विमान आकाशात पुन्हा झेपावले

Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे एअर इंडियाचे दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान अचानक पुन्हा आकाशात झेपावल्याची घटना सोमवार 12 ऑगस्ट रोजी रात्री घडली.

Chhatrapati Sambhajinagar
लँडिंग न करताच विमान आकाशात पुन्हा झेपावले

छत्रपती संभाजीनगर :  चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे एअर इंडियाचे दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान अचानक पुन्हा आकाशात झेपावल्याची घटना सोमवार 12 ऑगस्ट रोजी रात्री घडली.
चिकलठाणा विमानतळावर सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पंधरा मिनिटाच्या अंतराने आकाशात एकाच वेळी इंडिगोचे मुंबई ,हैदराबाद आणि एअर इंडियाचे दिल्ली विमान दाखल झाले. यावेळी एअर इंडियाचे विमान लँडिंगच्या तयारीत होते. मात्र त्याचवेळी या विमानाला लँडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हे विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि शहराच्या आकाशात घिरट्या मारू लागले. अचानक झालेल्या या प्रकाराने विमानातील प्रवासी काहीसे गोंधळून गेले. मात्र कोणतीही घटना घडली नसून, खबरदारीच्या दृष्टीने विमान आकाशात झेपावल्याची माहिती मिळाली आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »