dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Chhatrapati Sambhajinagar News: संभाजीनगर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्याची नियुक्ती करा –  अंबादास दानवे

Chhatrapati Sambhajinagar News : माजी आमदार संदीपान भुमरे यांची लोकसभा सदस्य म्हणून निवड झाली असल्याने विधानसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागील बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यासाठी पालकमंत्र्याची नियुक्ती करा, अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर :  माजी आमदार संदीपान भुमरे यांची लोकसभा सदस्य म्हणून निवड झाली असल्याने विधानसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागील बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यासाठी पालकमंत्र्याची नियुक्ती करा, अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त झालेले असल्याने जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक आजतागायत होऊ शकलेली नाही. तसेच पालकमंत्री पद रिक्त असल्याने जिल्ह्याचे नियोजन पूर्णतः ठप्प झाले आहे. संभाजीनगर जिल्ह्याला विविध विकास कामांसाठी प्राप्त झालेला निधी पालकमंत्री नसल्याने अखर्चित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या विकासावर त्याचा विपरित परीणाम होणार आहे. तसेच आगामी काळात राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार असल्याने तत्काळ नियुक्ती करणे आवश्यक असल्याची सूचना दानवे यांनी केली. जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची तातडीने नियुक्ती करुन संभाजीनगर जिल्ह्याला योग्य न्याय देण्याची अंबादास दानवे यांनी विनंती केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top