dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेतकऱ्यांना धीर, फायनान्स कंपन्यांना तंबी : मेहकर येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा 

मेहकर :  ‘शेतकऱ्यांनो काळजी करू नका, खचून जाऊ नका, हा काळ संकटाचा आहे. याची पूर्ण जाणीव आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे’ अशा शब्दांत धीर देत वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करून शिवेसेना स्टाईल उत्तर देऊ, अशी तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  

मेहकर :  ‘शेतकऱ्यांनो काळजी करू नका, खचून जाऊ नका, हा काळ संकटाचा आहे. याची पूर्ण जाणीव आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे’ अशा शब्दांत धीर देत वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करून शिवेसेना स्टाईल उत्तर देऊ, अशी तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  

     दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच संत श्री गजानन महाराज आणि शारंगधर बालाजी यांचे स्मरण करून अभिवादन केले. पुढे बोलताना शिंदे यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत दुष्काळ निवारणासाठी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत दिली जात असल्याचे सांगत जलतारा, पाणी आडवा पाणी जिरवा या सारखे महत्वपूर्ण उपक्रम राबवून बळीराजाला अडचणीतून बाहेर काढण्यात येत आहे.  राशन धारकांना अन्नधान्य, ग्रामीण आणि शहरी भागात सुरळीत पाणीपुरवठा अशा सगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, नांदेड येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ देत वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनीचा त्यांनी समाचार घेतला. अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा, जेलमध्ये टाका असा इशारा देत दादागिरी सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.  

योजनांचा लाभ, प्रत्यक्ष मदत 

राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ वंचित, दुर्बल आणि गोर गरीब घटकांना देण्याचा उपक्रम यावेळी राबविण्यात आला. यामध्ये, महिलांना शिलाई मशीन वाटप, दिव्यांगांना कुत्रिम साधन, रुग्णांसाठी आयुष्यमान कार्ड वाटप  आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी शेकडो नागरिकांनी विविध योजनेचा लाभ घेतला. 

सामूहिक विवाह, महिलांसाठी आरोग्य तपासणी 

 शेतकऱ्यांवर आर्थिक संकट असल्याने त्यांच्या पाल्यांसाठी सामुहिक विवाह लावण्यात येणार आहे. याशिवाय, शेतकरी महिलांची घरोघरी जाऊन तपासणी करून शिवसेना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

११ हजार बालकांची शस्त्रक्रिया केली

नवजात बालकाला हृदयाचे आजार वाढत आहे. त्यामुळे, वेळीच उपचार मार्गदर्शन घेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. राज्य सरकारने आजतागयात ११ हजारांपेक्षा जास्त बालकांच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवाला आधार दिला आहे, असेही शिंदे म्हणाले. 

जाधवांचे कौतुक, रायमुलकरांना विश्वास दिला

शेतकऱ्यांसाठी आपले सहा महिन्याचे वेतन देणारे प्रतापराव जाधव हे पहिले केंद्रीय मंत्री असतील असे कौतुक उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. तर, माजी आमदार संजय रायमुलकर यांना जनता पुन्हा संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top