Chhatrapati Sambhajinagar News : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या रेडिको मद्य निर्मिती कंपनीमध्ये दुर्घटना घडली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तर अन्य चार जन गंभीर जखमी आहेत. मध्ये निर्मितीसाठीच्या धान्य साठवलेल्या टाकीचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या रेडिको मद्य निर्मिती कंपनीमध्ये दुर्घटना घडली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तर अन्य चार जन गंभीर जखमी आहेत. मध्ये निर्मितीसाठीच्या धान्य साठवलेल्या टाकीचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी अडीच वाजता घडली.
शेंद्रा एमआयडीसीमधील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मक्याची साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या टाकीला (सायलो) लागलेली गळती दुरुस्त करताना अचानक टाकी फाटून हजारो टन मका अंगावर पडल्याने चार कामगारांचा मृत्यू, तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. किसन सर्जेराव हिरडे (४५, रा. नारेगाव, छत्रपती संभाजीनगर), दत्तात्रय लक्ष्मण बोंढरे (३५, रा. कुंभेफळ, छत्रपती संभाजीनगर), विजय भीमराव गवळी (४५, रा. मसनतपूर, छत्रपती संभाजीनगर), संतोष भास्कर पोपळघट (३०, रा. भालगाव, छत्रपती संभाजीनगर) अशी मृत कामगारांची नावे आहेत, तर वाल्मीक शेळके, प्रशांत सोनवणे, प्रकाश काकडे आणि संदीप घोडके हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानांसह करमाड पोलिसांनी आणि औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कामगारांना जेसीबी, पोकलेनच्या माध्यमातून बाहेर काढले.
या घटनेविषयी प्राथमिक माहिती अशी की, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको एन.व्ही. डिस्टलरीज ही मद्यनिर्मिती कंपनी २००८ पासून कार्यरत आहे. या कंपनीत रोज ७०० ते ८०० कामगार कार्यरत असतात. या कंपनीच्या अंतर्गत स्टोअरेज विभाग आहे. तेथील एका टँकमध्ये ३ हजार टन क्षमतेच्या टाकीमध्ये मका साठवून ठेवण्यात आली होती. या टाकीला गळती लागल्याने तांत्रिक विभागाचे कामगार टाकीची दुरुस्ती करत होते. या टाकीजवळच कामगारांच्या येण्या-जाण्याचा मार्ग आहे.
शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक टाकी फाटली. यात टाकीमधील हजारो टन मका दुरुस्ती करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडली. यामुळे आठ ते दहा कामगार मक्याच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या कामगारांना जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र, यात किसन हिरडे, दत्तात्रय बोंढरे, विजय गवळी, संतोष पोपळघट यांचा मृत्यू झाला. तर वाल्मीक शेळके, प्रशांत सोनवणे, प्रकाश काकडे आणि संदीप घोडके हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जखमी व मृत कामगार हे कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होते. या घटनेने शेंद्रा औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.