नवी दल्ली : जंतर-मंतरवर करण्यात आलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला होता. याप्रकरणी अखेर 21 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिस ठाण्याबाहेर शुक्रवारी जवळपास पाच तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला अखेर यश आले. दुपारपासून ते आंदोलनाला बसले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

राहुल गांधी यांनी पोलिस ठाण्याला भेट देत तपास कुठवर आला, गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल करत आंदोलन सुरू केले होते. राहुल गांधी यावेळी आपल्यासोबत पेलेट गन हल्ल्यात जखमी झालेल्या साहिल लोचाब याला देखील घेऊन गेले होते. पाच तासांपासून हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर पीडित साहिल लोचाब यांच्या तक्रारीच्या आधारे पेलेट गन प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी २० जुलै रोजी जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या कथित वापरासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही म्हणजेच अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेलेट गन कोणी चालवली?
साहिलच्या शरीरावरील व्रण दाखवत राहुल गांधी म्हणाले की, पेलेट गन चालवल्याचा हा पुरावा आहे. हे पॅलेट्स साहिलच्या शरीरातून बाहेर आले आहेत. जर पोलिसांनी पेलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? एफआयआर दाखल न करण्याचे वरिष्ठांकडून आदेश असल्याचे पोलीस सांगत आहेत. राहुल यांच्या ठिय्या आंदोलनाला प्रियांका गांधी, अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद आणि जयराम रमेश हेदेखील उपस्थित आहेत.
हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठीही नाही : जेपी नड्डा
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले, आज संपूर्ण देश पुन्हा एकदा राहुल गांधींचे खालच्या स्तराचे आणि लक्ष विचलित करणारे राजकारण पाहत आहे. आज पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर सुरु असलेला प्रकार सर्वांनी पाहिला आहे. राहुल गांधींचे आजचे आंदोलन विद्यार्थ्यांसाठीही नाही आणि न्यायासाठीही नाही. हे काँग्रेस पक्षाची राजकीय निराशा आणि राहुल गांधी प्रसिद्धीची भुकलेले असल्याचे दाखवते. संपूर्ण देशाला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने २० जुलैच्या घटनेची आधीच दखल घेतली आहे आणि एका माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेत्याचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? असा सवाल जेपी नड्डा यांनी विचारला.