dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेमीयुगुलाची आत्महत्या

मेडशी  : मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी गावाजवळील मोर्णा तलावात मंगळवारी सायंकाळी प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या पोलिस तपासात दोघांचे प्रेमसंबंध होते आणि आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी तलावात उडी घेऊन जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

१४ ऑगस्टपासून होते बेपत्ता; १८ ऑगस्टला मोर्णा तलावात आढळले मृतदेह

मेडशी  : मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी गावाजवळील मोर्णा तलावात मंगळवारी सायंकाळी प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या पोलिस तपासात दोघांचे प्रेमसंबंध होते आणि आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी तलावात उडी घेऊन जीवन संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृतांमध्ये गोकसावंगी येथील महादेव गजानन निंबाळकर (२४) आणि निकीता संतोष कांबळे (१९) यांचा समावेश आहे. दोघेही १४ ऑगस्टपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत मालेगाव पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोघांचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांनी विवाह करण्याची इच्छा कुटुंबीयांना सांगितली होती. मात्र, दोघे वेगवेगळ्या जातीतील असल्याने त्यांच्या विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता. वारंवार समजावून सांगूनही विवाहाला संमती मिळत नसल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.

मासेमारीला गेलेल्यांना दिसले  मृतदेह

१८ ऑगस्ट रोजी काही नागरिक मासेमारीसाठी मोर्णा तलाव परिसरात गेले असता त्यांना दोघांचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top