माहोरा : जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा पाटीजवळ बसला अपघात झाला. जाफराबाद येथून माहोऱ्याकडे जाणारी बस ( एमएच 6 एस 8700 ) चिंचखेडा पार्टीजवळील देवीच्या मंदिराजवळील वळणावर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले.

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा पाटीजवळ बसला अपघात झाला. जाफराबाद येथून माहोऱ्याकडे जाणारी बस ( एमएच 6 एस 8700 ) चिंचखेडा पार्टीजवळील देवीच्या मंदिराजवळील वळणावर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमधील 30 प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना मंगळवार, 15 एप्रिल रोजी घडली.
मानव विकास मिशनची ही बस होती. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. त्यापैकी ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून उर्वरित प्रवासी सुखरूप आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बसचालकाने एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण गमावले आणि बस थेट रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.
घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवा पवार, पोलीस कर्मचारी होमगार्ड दीपक सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि आवश्यक ती मदत पुरवली. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.