बुलढाणा : ब्रेक फेल होवून शिवशाही बसचा अपघात झाल्याची घटना आज, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खामगाव – बुलढाणा मार्गावरील बोथा घाट परिसरात घडली.

बुलढाणा : ब्रेक फेल होवून शिवशाही बसचा अपघात झाल्याची घटना आज, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खामगाव – बुलढाणा मार्गावरील बोथा घाट परिसरात घडली.
प्राप्त माहितीनुसार, एसटी महामंडळाची शिवशाही बस शेगावहून बुलढाण्याच्या दिशेने येत होती. दरम्यान, बसचे ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या एका कडेला बस सरकली. तितक्यात पाठीमागून येणाऱ्या एका वाहनाची धडक झाली. यात, ते वाहन उलटले. पाठीमागच्या या वाहनातील प्रवाश्यांना दुखापत झाली असून, त्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात आणले जात आहे. या अपघातामुळे बऱ्याच वेळ वाहतूक ठप्प होती. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत असल्याची माहिती आहे.