dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गुलाबराव पाटील कोलते यांचा भाजपमध्ये प्रवेश

सावळदबारा :  शिवसेना (उबाठा) पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी आपल्या समर्थकासह भारतीय जनता पक्षामध्ये सोमवार, 19 जानेवारी रोजी प्रवेश केला. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुलाबराव पाटील कोलते यांची सोयगाव तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती केली.

गुलाबराव पाटील कोलते यांच्या भाजप पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यख इद्रिस मुलतानी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील मिरकर, तालुकाध्यक्ष संजय पाटील, व्हीजेएनटीचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, जिल्हा सचिव सुनील गावंडे, माजी सभापती उत्तम चव्हाण, संभाजी पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी फर्दापूर सर्कलमधील एकनाथ सपाटे, ताराचंद राठोड, गुलाब राठोड, सरपंच बळीराम जाधव, मोहन चव्हाण, करतार चव्हाण, प्रदीप चव्हाण, सिताराम जाधव, हेमा राठोड, श्रावण पवार, बुहान तडवी, विजय राठोड, उत्तम राठोड आदींनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top