Earthquake in Tibet : तिबेटमधील सर्वात पवित्र शहरापैकी एक असलेल्या शिगाझेमध्ये मंगळवारी 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यात किमान 95 लोक ठार आणि 130 जखमी झाले आहेत.
बीजिंग : तिबेटमधील सर्वात पवित्र शहरापैकी एक असलेल्या शिगाझेमध्ये मंगळवारी 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यात किमान 95 लोक ठार आणि 130 जखमी झाले आहेत. शेजारील देश नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे इमारती हादरू लागल्या आणि लोक घराबाहेर पडले.
प्रादेशिक आपत्ती निवारण मुख्यालयानुसार, मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता (चीन वेळेनुसार) तिबेट स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहरातील डिंगरी काउंटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने भूकंपाची तीव्रता 7.1 इतकी नोंदवली आहे. मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) दुपारी 3 वाजेपर्यंत भूकंपामुळे 95 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि 130 जण जखमी झाले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बाधित भागात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. शी यांनी जखमींवर उपचार करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्याचे आदेश दिले आणि दुय्यम आपत्ती (भूकंपानंतर उद्भवणाऱ्या आपत्ती), बाधित रहिवाशांचे योग्यरित्या पुनर्वसन आणि पाठपुरावा कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. भूकंपानंतर, चायना भूकंप प्रशासनाने लेव्हल-टू आपत्कालीन सेवा प्रतिसाद सुरू केला आणि आपत्ती निवारण प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी एक कार्य टीम साइटवर पाठवली.
दीड हजारावर अग्निशमन दल आणि बचाव कर्मचार
केंद्रीय अधिकाऱ्यांनी सुमारे 22,000 आपत्ती निवारण वस्तू भूकंपग्रस्त भागात पाठवल्या आहेत, ज्यात तंबू, कोट, रजाई आणि फोल्डिंग बेडिंग, तसेच उच्च-उंची आणि थंड भागांसाठी विशेष मदत वस्तूंचा समावेश आहे. 1,500 हून अधिक स्थानिक अग्निशमन दल आणि बचाव कर्मचारीही घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. शिगजेला शिगस्ते असेही म्हणतात जे भारतीय सीमेजवळ आहे. शिगात्से हे तिबेटमधील सर्वात पवित्र शहरांपैकी एक मानले जाते.