Bus accident at Ambad station : अंबड स्थानकांत बसचा अपघात; एक ठार सहाजण जखमी

Bus accident at Ambad station

Bus accident at Ambad station : सिल्लोडला जाणारी अंबड आगाराची बस फलाट क्रमांक एकवर उभी करताना वाहन चालकाला बसचे ब्रेक लागले नाही. त्यामुळे बस चार क्रमांकांच्या फलाटावर घुसली. यात तिथे उभे असलेले 7 प्रवासी जखमी झाले. उपचारादरम्यान एका प्रकाशाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली.

Bus accident at Ambad station

अंबड : सिल्लोडला जाणारी अंबड आगाराची बस फलाट क्रमांक एकवर उभी करताना वाहन चालकाला बसचे ब्रेक लागले नाही. त्यामुळे बस चार क्रमांकांच्या फलाटावर घुसली. यात तिथे उभे असलेले 7 प्रवासी जखमी झाले. उपचारादरम्यान एका प्रकाशाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता घडली. खलीलउल्ला अजीमुल्लाह शेख ( रा.जुना जालना ) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

अंबड आगारातून सिल्लोडला जाण्यासाठी निघणारी बस ( एम.एच.20 बी.एल्.1606 ) घेऊन बसचालक व्ही.एस. राठोड दुपारी फलाटावर लावत असताना वाहन चालकाला बसचे ब्रेक लागले नाही. त्यामुळे बसचे नियंत्रण सुटल्याने बस सरळ स्थानकांत आडवी घुसली. यावेळी बस स्थानकांत बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची मोठो गर्दी होती. त्यामुळे सात प्रवासी जखमी झाले. यापैकी जालना येथील प्रकाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी झालेल्यांमध्ये अनिता बंडू गुंजाळ ( वय 30 वर्ष फुले नगर अंबड ), पार्वती धोंडीराम नवघरे ( वय 30 वर्ष रा.जामदाये ता.हिंगोली ), मुरलीधर आनंदरावं काळे ( वय 50 वर्ष रा.शेवगा ), पूजा कडुबा धोत्रे ( वय 4 वर्ष) हिना अलीम शेख ( वय 30 वर्ष रा.धाकलगाव), रेहाना शेख अलीम ( 1 वर्ष रा.धाकलगाव ) यांचा समावेश आहे. यापैकी दोन जखमीना अंबड ग्रामीण रुग्णालयात व ५ जखमींना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी दिली.

 

अपघातग्रस्त बसची तपासणी यंत्र अभियंता जालना यांच्याकडून करण्यात आली. बस तपासणी केल्यावर बसमध्ये कसलाही यांत्रिक बिघाड झाला नसल्याचे सांगण्यात आले. अपघातात जखमीना तातडीने रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले आहे. महामंडळाच्या नियमानुसार वैद्यकीय मदत पुरविल्या जाईल. अपघाताची चौकशी सुरु आहे.

– रणवीर कोळपे, आगार प्रमुख, बस स्थानक, अंबड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »