Buldhana vote counting:  तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे संजय गायकवाड ३ हजार ८३४ मतांनी आघाडीवर!

Buldhana vote counting

Buldhana vote counting:  विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, तिसऱ्या फेरी अखेर बुलढाणा विधानसभेत महायुतीचे संजय गायकवाड ३ हजार ८३४ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Buldhana vote counting

बुलढाणा: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत असून, तिसऱ्या फेरी अखेर बुलढाणा विधानसभेत महायुतीचे संजय गायकवाड ३ हजार ८३४ मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नऊ टेबल वरून पोस्टल मते मोज ली जात आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी 14 टेबल याप्रकारे एकूण 98 टेबल वरून जिल्ह्यातील सात मतदारसंघाची मतमोजणी होत आहे.

मतदारांच्या संख्येनुसार फेऱ्या होणार आहेत. मलकापूरमध्ये २२, बुलढाण्यात २४, चिखलीमध्ये २३, सिंदखेड राजात २५, मेहकरमध्ये २५, खामगावात २३. जळगाव जामोदमध्ये २३ याप्रमाणे मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. प्रथम टपाली मतांची मोजणी होत आहे. मतदानाचा दिवस असल्याने राजकीय पक्षांसह तमाम मतदारांमध्ये उत्सुकता आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होत असून, महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्यात मुख्य लढत होत आहे. दरम्यान, टपाली मतदानापासून संजय गायकवाड यांनी आघाडी घेतली असून तिसऱ्या फेरी अखेर ३०८३४ मतांनी ते आघाडीवर आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »