Buldhana Crime: बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव धाड येथील एका जुन्या घरात गुप्तधन शोधण्यासाठी नरबळीवर विश्वास ठेवून मुलीचा जीव घेण्याचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा आरोपी असलेला भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे (रा.धामणगाव धाड,ता. बुलढाणा) याने केला आहे. वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेर यांच्या आत्महत्या प्रकरणात गणेश लोखंडे आरोपी असून, तो आहेर यांच्या मुलीचा गुप्तधनासाठी बळी घेणार होता.
भोकरदन : बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव धाड येथील एका जुन्या घरात गुप्तधन शोधण्यासाठी नरबळीवर विश्वास ठेवून मुलीचा जीव घेण्याचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा आरोपी असलेला भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे (रा.धामणगाव धाड,ता. बुलढाणा) याने केला आहे. वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेर यांच्या आत्महत्या प्रकरणात गणेश लोखंडे आरोपी असून, तो आहेर यांच्या मुलीचा गुप्तधनासाठी बळी घेणार होता. भोकरदण पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने स्वतः ही कबुली दिली आहे.
भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर भिका आहेर (30 वर्ष) यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी ३ मार्च रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. यानंतर, मृतक आहेर यांच्या कपड्यांची तपासणी केली असता त्यांच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली होती. त्यात बुलढाणा तालुक्यातील धामणगाव धाड येथील भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याने दिलेल्या मानसिक त्रासातूनच ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. यावरून पोलिसांनी तात्काळ गणेश लोखंडे यास धामणगाव येथून अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 10 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. धामणगाव धाड येथील एका जुन्या घरात वीस फूट खोल खड्डा खोदून गुप्तधनाच्या हव्यास नरबळी देण्याचा कट आरोपी गणेशने रचला होता. यामध्ये तो, आत्महत्या केलेल्या ज्ञानेश्वर आहेर यांच्या मुलीचा बळी घेणार होता. अशी त्याने पोलिसांना कबुली दिली. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके हे करीत होते.