अकोला : छत्रपती संभाजीनगर येथील मुगल बादशाह औरंगजेबची कबर तोडण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी ता.११ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन सुद्धा देण्यात आले.

निवेदनावर उल्लेख करण्यात आला आहे की, औरंगजेबने भारतावर आक्रमण केले. हिंदूचे धर्मांतरण केले. महिलांवर सामूहिक अत्याचार केले. त्यांची निर्घृण हत्या केली. मंदिरे तोडून मंदिरांवर मशिदी बांधल्या व मंदिराचे सोने-चांदी, मौल्यवान वस्तू लुटून विशिष्ट धर्माचा प्रचार केला. याला प्रतिउत्तर देण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांची सेना तयार केली व देशाच्या संरक्षणाचे कार्य केले. हेच काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा केले, परंतु संभाजी राजेंना बंदी बनवून त्यांच्यावर निरंतर ४० दिवस अत्याचार करण्यात आले व त्यांची हत्या करण्यात आली. सदर हत्या मानवतेला लाजवणारी आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन संभाजीनगर येथील औरंगजेब यांची कबर तोडण्याची मागणी सकल हिंदू समाच्या वतीने मंगळवारी निदर्शने करत करण्यात आली. या आंदोलनात उमेश लख्खन, मयूर गुजर, संदीप बाथो, तुषार गोतमारे, अँड पावस सेंगर, संग्राम खानझोडे, आकाश ठाकरे, निखिल थोरात चेतन सोमानी, पवन नरवाडे, चंद्रमोहन इंगळे, महेश जोशी, केशव ठाकरे आदींची उपस्थिती होती.