बुलढाणा: जिल्हा नुटा संघटनेचे अध्यक्ष म्हणून जिजामाता महाविद्यालयातील प्रा डॉ सुबोध चिंचोले यांची नुकतीच अविरोध निवड करण्यात आली.

बुलढाणा: जिल्हा नुटा संघटनेचे अध्यक्ष म्हणून जिजामाता महाविद्यालयातील प्रा डॉ सुबोध चिंचोले यांची नुकतीच अविरोध निवड करण्यात आली.
जिजामाता महाविद्यालय सभागृहात रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत सात सदस्यीय बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक संपन्न झाली. यात अध्यक्षपदी प्रा डॉ सुबोध चिंचोले, उपाध्यक्ष प्रा डॉ विजयश्री हेमके (चिखली), सचिव प्रा डॉ गोकुळ काळे (खामगांव), सहसचिव प्रा डॉ गजानन डोंगरे (चिखली), कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा. वाय. पी. पाटील (मलकापूर), प्रा डॉ राजेन्द्र कोरडे (वरवंट बकाल), प्रा डॉ दिपक नागरिक (खामगांव) यांचीही अविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून नुटा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा डॉ प्रविण रघुवंशी, सिनेट सदस्य प्रा डॉ रविन्द्र मुंद्रे, प्रा डॉ सुभाष गावंडे तसेच कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ ए. एम. गारोडे हे उपस्थित होते. निवडीबद्दल जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश गवई तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला. जिजामाता महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व माजी विद्यार्थी संघटना यांनी सुध्दा त्यांचे याप्रसंगी कौतुक केले.